दादू मान्द्रेकर
दादू मान्द्रेकर यांचे 26 नोव्हेंबर 2020 रोजी निधन
दादू मान्द्रेकर यांचे वयाच्या 63व्या वर्षी अल्प आजारानंतर दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता गोव्यातील टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या गोवाआवृत्तीत तसेच अन्य बहुतेक गोमंतकीय वृत्तपत्रांतून आलेली दिसते. यांत दै.लोकमत, दै. तरूण भारत, दै.गोमन्तक. दै.गोवनवार्ता, दै.दैनिक हेराल्ड, दै.भांगरभूंय यांचा समावेश होता. दै. नवप्रभा या वृत्तपत्राने दि 27 नोव्हेंबर 2020 रोजी एक संपूर्ण पान दादू मान्द्रेकर यांच्याकरिता वापरले आहे.
गोव्यातील एक आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीत दि. 27 नोव्हेंबर 2020च्या अंकातील बातमीत म्हटले आहे की ‘सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते, लेखक, कवी, पत्रकार दादू मांद्रेकर (63) यांचे गुरूवारी संविधान दिनीच (बातमीतील संविधान दिनास अनुसरून उल्लेख दादू मान्द्रेकर यांच्या भारतीय संविधानातील मू÷ल्यांबद्दल त्यांच्या आग्रही मतांमुळे व त्यांच्या ‘प्रजासत्ताक’च्या संपादनामुळे असावा)निधन झाले. मांद्रेकर यांना कोविडची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केली होती. तथापि, पुन्हा आजारी पडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. ते मांद्रे येथे राहायचे. कालच त्यांच्या पार्थिवावर स्थानिक दफनभूमित बुद्धपरंपरा पाळून करण्यात आले.’(sic)
या बातमीच्या मथळ्यात ‘आंबेडकरवादी चळवळीचा शिलेदार हरपला’ असे म्हटले आहे.,
गोव्यातील अन्य एक आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीच्या 27 नोव्हेंबर 2020च्या अंकात म्हटले आहे की - ‘गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे अग्रणी दलितनेते दादू मांद्रेकर यांचे 26 रोजी म्हणजेच भारताच्या संविधान स्थापना दिनीच निधन झाले. ते आजीवन भारताच्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करत राहिले. संविधानातील समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्ष आदी मुल्यांची (sic) समाजात रूजवण व्हावी यासाठी अखेरपर्यंंत ते कार्यरत राहिले. आजारातून तेे बरे झाले होते, मात्र प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. अखेर त्यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. बुधवारी मांद्रे येथे स्थानिक दफनभूमीत बौद्ध धर्मानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते उत्कृष्ट कवी, छायाचित्रकार आणि स्पष्टवक्ते म्हणून परिचित होते. ’
त्यांच्या निधनाबद्दल समाजातील सर्व क्षेत्रातील, स्तरातील, धर्मांतील लोकांकडून दु:ख व्यक्त केल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यावरून दिसून येते. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनीही त्यांच्या निधनानंतर शोकसंदेश जारी केलेले दिसतात.
दरम्यान, तिबेतच्या भारतस्थित निर्वासित सरकारचे सभापती Pema Jungney यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यत केलेले दिसते. “I am saddened to learn the demise of Shri Dadu Mandrekar who was a staunch and ardent supporter of our cause. On behalf of the 16th Tibetan Parliament in Exile, I would like to pay my sincere condolences to you and your family.” ही बातमी येथे क्लिक करून पाहता येईल.
दरम्यान, लोकमतने दादू मान्द्रेकर यांच्या निधनाच्या दुसर्या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी गोवा आवृत्तीच्या अंकात अग्रलेख लिहिलेला दिसतो. ‘एक झंझावात निमाला’ या शीर्षकाच्या या अग्रलेखात दादू यांच्या व्यक्तीमत्त्वाचे चित्रण करण्यात आल्याचे दिसते. अग्रलेखातील काही नोंदी अशा -
‘दादू मांद्रेकर यांच्या निधनाने गोव्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशात निर्माण झालेले न्यूनत्व बराच काळ राज्यातील संवेदनशील मनांना सलत राहील. आपल्या पटलेल्या कारणासाठी जिवाचे रान करणारा तो हाडाचा कार्यकर्ता होता’
‘आंबेडकरांच्या प्रतिपादनाची चिकित्सा दादूने आपल्या विवेकाच्या सहाणीवर घासून केली. दलित उत्थानाची घाऊक कंत्राटे घेतलेल्या राजकारणपटूंच्या भोंदू अवसानाचे मर्मही त्याने समजून घेतले आणि मगच आंबेडकरी विचार श्रेष्ठ मानून त्याने या विचारांच्या प्रसारास वाहून घेतले. त्याच्या वैचारिक धारणांना प्रचंड वाचनाचे अधिष्ठान होते.’
दादू मान्द्रेकर आपल्या निवासस्थानी. (फोटो: विकिमिडीया) |
चार पुस्तकांचे प्रकाशन
दादू मांद्रेकर यांचा 'शापित सूर्य 'च्या
मलपृष्ठावरील फोटो. टिपणारे : डॉ. सुबोध केरकर.
|
नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ही पुस्तके क्राऊड फंडिंगद्वारे काढण्यात आली आहे असेे म्हणता येईल. पुस्तकांच्या मागे 79 जणांची यादी असून त्यांनी आर्थिक मदत केल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारेे क्राऊड फंडिंगद्वारे पुस्तके प्रकाशित करणारे ते गोव्यातील एकमेव असावेत. एकूण मराठी साहित्याच्या क्षेत्रातही आधुनिक काळात अशाप्रकारे पुस्तके प्रकाशित व्हावीत हे नवीन असावे.
या कार्यक्रमात प्रकाशित चार पुस्तके अशी :
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि महत्म्य (लेखसंग्रह)
2. भारतीय संविधान : आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि परिणाम (लेखसंग्रह)
3. ओंजळ लाव्हाची (कवितासंग्रह)
4. उंबरठा (पाच हजार वर्षांतील भारतीय स्त्रीत्वाचा आढावा घेणारी दीर्घकविता)
A Thorny Flower
……
The sentence used by Dadu in his first-ever article was high-lighted by the-paper. It ran like this:
……
.....
The basic trait of Dadu Mandrekar's poetry is reformation and expectation of a change in confronting dreadful reality, false rites and the feeling of high high-low among the human beings.He has given vent to his feelings against gross social injustice. It is an outburst of a sensitive reformative poet.
दादू : काही निरीक्षणे
आंबेडकरवादाचा प्रसार दादूने गोव्यात केला. 1998 मध्ये त्यांनी दोन दिवसांचे आंबेडकर विचार संमेलन भरविले. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. अरूण कांबळे, गंगाधर पानतावणे यांच्या परिवर्तनवादी विचारांनी गोव्यात नवचैतन्य निर्माण झाले. बौद्ध धम्माची दीक्षा दादूने घेतली. परन्तु गोव्यात आपण एकटे पडत असल्याची त्याची भावना आहे. कविता कुणाला वाचून दाखवायची आहे, असा प्रश्न दादू समोर पडणे साहजिक आहे. ‘शापित सूर्य’ या त्यांच्या संग्रहात सांस्कृतिक संघर्ष चित्रित झालेला दिसतो.
- नरेंद्र बोडके
(गोमंतकीय मराठी कवितेचे अर्धशतक, संपा. नरेंद्र बोडके, 2010, प्रका. नंदिनी तांबोळी, पुणे)
सुरूवातीचे दिवस आणि 'आंबेडकरी' वाटचाल
आणखी माहिती…
नारायण सुर्वे यांच्या 'शुभेच्छा'
नारायण सुर्वे
20 जुलै 90
कवितेच्या ‘वेशीवरून’
बाबासाहेब-बुद्ध-ज्योतिबा हे माझे आदर्श. त्यांचे विचार म्हणजे चंदन अग्नी. शापित सूर्या नंतर त्याच पद्धतीची कविता ह्या दुसर्या कविता संग्रहात वाचकांना वाचायला मिळेल. बाबासाहेबांचे एक रूप म्हणजे ज्वालामुखीचेच रूप. सतत जाळणे आणि त्यातून नवे सृजन जन्माला घालणे हा आंबेडकरी विचारांचा गाभा. त्या गाभ्याचे अंतरंग म्हणजे हा कविता संग्रह. ही कविताही पचवणे वाचकांना जड जाईल.
पंचवीस वर्षांत दोनशे पंचवीस तरी कविता स्फूरायला हव्या होत्या, पण तसे माझ्या बाबतीत होत नाही. एखादी कविता स्फूरली तरी ती क्वचितच एका बैठकीत पूर्ण होते. अन्यथा कित्येक वेळा कविता पूर्ण व्हायला महिनोन महिने लागतात.
माझ्या बाबतीत फुला-मुलांची कविता मला सहजस्फूर्त असते, पण सामाजिक परिवर्तनासाठी त्या कवितेचा काही उपयोग होत नसतो याची मला अगदी मी 18-20 वर्षांचा असताना एकदा मला जाणीव झाली आणि ती कविता मला सहजस्फूर्त असूनही मी त्याच्यामागे मागे धावलो नाही. एक निर्भेळ आनंदासाठी तशी कविता ठीक आहे. सामाजिक परिवर्तनासाठी कविता उपयुक्त नाही !
परिवर्तनवादी कविता मी वर म्हटल्याप्रमाणे एक प्रकारचा वैचारिक अग्नी, प्रलयच असतो आणि विशेष म्हणजे तो आंबेडकरवादी कवितेतून अगदी प्रत्ययास येतो !
माझी कविता ही अशीच आहे. ‘शापित सूर्य’ झाल्यानंतर हा दुसरा काव्यसंग्रह.
या काव्यसंग्रहाचे नामाभिमान (sic) काय असावे या विचारात असतानाच ही एक काव्य पुष्पांजलीच आहे याची मला एकाएकी जाणीव झाली, पण ओंजळीत फुलाऐवजी अंगार भरलेले आहेत आणि ती ओंजळ आपण कोणत्या तरी नव्या निर्माणासाठी कोणाला तरी अर्पण करत आहोत असे चित्र समोर आले. त्याचवेळी लाव्हा ओकणारा पर्वतही समोर आला आणि या काव्यसंग्रहाला एक समर्पक नाव मिळाले ‘’ओंजळ लाव्हाची...!’
नित्याच्या घडामोडीवर परखड भाष्य करणार्या चार-सहा ओळींच्या कवितांची दैनंदिन प्रहसनात्मक सदरे मी अनेक वर्षे लिहित आलो. ती कोण लिहितो हे सामान्य वाचकांना अजूनही माहित नाही. हे एक वैचारिक प्रहसनच असते ! त्यामुळे अशी कविता मला स्फुरणे हा माझ्या (sic) स्थायीभाव आहे, पण या काव्यसंग्रहात समाविष्ट केलेल्या कविता स्फूरतानाचा आशय हा मनात कित्येक दिवस धुमसत असायचा !
माझे मन अतिशय जागृत असते. ते अतिशय तरल आणि संवेदनशील असते. त्यामुळे कुठल्याही अवतीभवती घडलेल्या घटनांचे साद-पडसाद लगेच माझ्या मनावर उमटतात. अन्याय आणि बदमाशगिरी यावर तत्काळ प्रतिक्रिया उमटतात.
... माझे शब्द हेच माझे हत्यार. मी शब्दानी तलवारीसारखे सपासप वार करतो. माणसाच्या, राष्ट्राच्या भवितव्यासाठी जे शब्द वज्रासारखे माझ्यासमोर फेर धरून नाचतात, तसेच आजही मृदू मुलायम शब्द एखादी निसर्गाची कविता स्फूरताना माझ्यासमोर फेर धरून नाचतात.
...पण अश्या कवितानी एक निखळ आनंद मिळतो तेवढाच ! बाकी सामाजिक परिवर्तनाचा एकही अणू एइकडून (sic) तिकडे हालत नाही. त्यामुळे मी निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेलो असूनही मी अश्या कवितांच्या आहारी गेलो नाही.
आज जे लाव्हाचे रूप आहे तेच एकवेळ पूर्ण पृथ्वीचे रूप होते. कालांतराने पृथ्वी थंड पडत गेली आणि तिने पृथ्वीवर आज जे आपल्याला दिसते ते सृजन घडवले. ! माझ्या आग ओकणार्या कवितेकडूनही मी हीच अपेक्षा ठेऊन आहे.
भारतातल्या सामान्य माणसाचे देवा-धर्मावर चालणारे शोषण थांबले पाहिजे आणि जाती-धर्म, कर्मकांड आनी (sic) ईश्वर, देव या सार्या नरकातून सामान्यातला सामान्य माणूस बाहेर आला पाहिजे हिच माझी अंतिम इच्छा आहे !
माझी कविता त्यादृष्टीने कारण ठरली तर मला निरतिशय आनंद होईल!
‘बहिष्कृत गोमंतक’विषयी
...सामाजिक पातळीवर ‘आम्ही कोण?’ या स्वरूपात इथल्या शिशित दलित तरुणाला पडला. त्याचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करू लागला, संघटितपणे करू लागला. या अशा प्रयत्नांचे फलित म्हणजेच आयुष्यमान दादू मांद्रेकर आणि ‘बहिष्कृत गोमंतक’ हा त्यांचा ग्रंथ.
‘पर्यावरण’ आणि ‘प्रजासत्ताक’
दादू मांद्रेकर यांनी ‘प्रजासत्ताक’ हे वार्षिक व ‘पर्यावरण’ हे अनियतकालिक संपादित केले. पैकी वार्षिकाचे २००६ ते २०१४ असे आठ अंक तर अनियतकालिकाचे 2012 व 2013 असे दोन अंक निघालेले दिसतात. ‘प्रजासत्ताक’चा २००९चा अंक निघाला नाही.
संविधानाचा संस्कार रुजवू पाहणारे ‘प्रजासत्ताक’
(दै. नवप्रभा च्या रविवार दि. 14 मार्च 2010च्या रविवार ‘अंगण’ पुरवणीत समीर झांट्ये यांनी लिहिलेले ‘प्रजासत्ताक’चे परीक्षण)प्रजासत्ताक वार्षिकाची मुखपृष्ठे
अंक 1 ला - 2006 |
अंक 2 रा - 2007 |
अंक 3 रा - 2008 |
अंक 4 था - 2010 |
अंक 5 वा - 2011 |
अंक 6वा - 2012 |
अंक 7 वा - 2013 |
अंक 8 वा - 2014 |